top of page
Search

My Toys Tips #1(मराठी लेख )

Updated: Apr 2

Bade Miyan Toh Bade Miyan ... Chote Miyan subhan Allah!!

म्हणजे मला असं म्हणायच आहे छोटे activity toys हे जास्त fruitful असतात माेठया toys (rideons, big teddies :)) पेक्षा !

Toys म्हणजे मुलांचे भावविश्व! आपण नेहमीच दुरलक्ष करतो अशी एक गोष्ट. आपण मुलांना खेळणी तर फार आाणुन देतो पण कधीही त्याच्या सोबत खेळत नाही. किंवा खेळण्यांना तितकेसे महत्त्व देत नाही.

मला असं वाटते खेळण्यांमुळे मुलांची imagination power वाढते. फार concept clear हाेतात. Education तर मिळतेच. Motor Skills develop हाेतात. सरवात महत्त्वाचे म्हणजे ते engage राहतात !

मी बरयाच घरी बघते आई वडील मुलांना खुप सारे माेठे toys जसे Ride ons, Remote control cars, soft toys घेऊन देतात, पण असे Toys घरात फार जागा घेतात आणि मुल फार काळ खेळतही नाहीत. त्या पेक्षा मुलांना Activity Toys, Puzzles, Blocks, Educational Game, Colour Recognising toys असे toys घेऊन दयावे. त्या मागे माझा त्यांना फार शिकवण्याचा कींवा त्यांना खुप हुशार बनवनयाचा हेतु मुळीच नाही तर त्यांचे mind occupied ठेवण्याचा मुख्य हेतु आहे. आणि माझ असं Observation आहे की अशया toys मधे मुल जास्त involved हाेतात. हाे फक्त आपल्याला त्याच्या मधे ही आवड निर्माण करावी लागते!

मला 2& half years ची मुलगी आहे. तीला खेळणी फार आवडतात. ती खेळण्यांसोबत फार रमते. नेहमी तीच्या सोबत आपल्याला ही खेळायला बसवते.

मी माझ्या मुली च्या बाबतीत एक observed केलं आहे की ती जरा कमी हट्टी आहे, मस्ती फार करते पण चीडचीड, रडणे फार कमी, कारण मला असं वाटत तीची energy खेळण्यांकडे Divert हाेते. आणि एक Interesting बाब म्हणजे तीला Alphabets, fruits, vegetables recognition 2-3 pieces puzzles, body parts, drawing हे सर्व फार easily येत, मी कधीही फार न शिकवता! ती खेळतांना फक्त आपण थाेड लक्ष ठेवल आणि तीच्याशी थाेड बाेलत राहिल की झालं !

Toys मुळे मुलांना हाेणारे फायदे:

1. Observation Power खुप वाढते.

2. Concentration वाढते.

3. Mobile/ Tv screen time automatically कमी हाेताे.

4. Hyper active मुलांना Control करणे साेपे जाते.

5. Motor skills फार fast build हाेतात.

तर मैत्रीनींनो, माझे असे मत आहे आईने फक्त मुलांचया जेवनाकडे, vitamins, protein intakes कडेच लक्ष न देता त्याच्या toys कडे ही थाेडया वेगळ्या नजरेने बघावे!

Note : मी काेणीही child psychologist किंवा Doctor नाही, मी फक्त एक आई आहे. थाेडया वेगळ्या वाटेने विचार करणारी ! आणि ही माझी पद्धत आहे (tried and tested ) माझ्या मुलीसाठी toys choose करण्याची.

आवडल्यास Comment जरुर करा!


ree


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page